मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात भाजपच्या मुंबई विभागीय युवक आघाडीचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नवाब मलिक यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar)यांनी नवाब मलिक (nawab malik )तसेच महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधत टोला लगावला आहे.
ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ आहे की Bail बाजार? असा सवाल करणारे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. दरम्यान कंबोज यांनी दाखल केलेल्या फौजदारी स्वरुपाच्या बदनामीबाबतच्या तक्रारीवर न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रक्रिया नोटीस बजावली होती. गेल्या महिन्यात एनसीबीने क्रूझवर छापा टाकला होता. यानंतर मलिक यांनी माझी आणि माझ्या मेहुण्याची बदनामी केल्याचा आरोप कंबोज यांनी आपल्या तक्रारीत केला होता.
हे मंत्रिमंडळ आहे की Bail बाजार? @mohitbharatiya_ pic.twitter.com/cUhVfYF3pU
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 30, 2021
मलिक यांच्या वक्तव्यामुळे तक्रारदाराच्या प्रतिमेला तडा गेल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ५०० (मानहानी) अंतर्गत मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणीच मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- ट्विटरच्या प्रमुखपदी पराग अग्रवाल: एलॉन मस्कने केले कौतुक,म्हणाले..
- शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला- चंद्रकांत पाटील
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य


