मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत शपथ घेतली होती. त्यांच्या या शपथविधीची जोरदार चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी आता या निर्णयावरुन पश्चात्ताप व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष झाल्याच्या निमित्ताने मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केलं होतं. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता. आम्ही जशास तसं उत्तर देण्याचा विचार केला याचा मला पश्चात्ताप आहे. हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असं सारखं वाटतं. मला माहिती आहे त्यावेळी काय झालं होतं आणि कोणी काय केलं होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मी एक पुस्तक लिहिणार असून त्यामध्ये या सर्व घटना उघड करणार आहे. राज्यात फक्त सरकार असून प्रशासन नाही, अशी टीकाही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- ट्विटरच्या प्रमुखपदी पराग अग्रवाल: एलॉन मस्कने केले कौतुक,म्हणाले..
- शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला- चंद्रकांत पाटील
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य


