Share

दीड फूट उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झालेला; नीलेश राणेंवर राष्ट्रवादीची टीका

Published On: 

बीड: राणे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच टीका करत सुटलं आहे. टीका करण्याची एकही संधी राणे पिता-पुत्र सोडत नसल्याचे दिसत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून असो किंवा पत्रकार परिषद असो, सर्वच माध्यमातून केवळ टीका करणे सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा डान्स करतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत टीका केली होती.

संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि राऊत यांनी एकत्र डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून टीका करताना निलेश राणे म्हणाले होते की,’ दारू वरची एक्साईज ड्युटी ५०% कमी करण्याचं कारण आत्ता समजलं. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करत आहेत. दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं याचं उदाहरण हा व्हिडिओ आहे. या नेत्यांना काही पडली नाही कोणाची, अशी टीका नीलेश राणे यांनी केली होती.

भाजप नेते नीलेश राणे यांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादीने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी नीलेश राणे यांना चांगलाच टोला लगावला आहे. निलेश राणे यांच्या याच ट्विटला उत्तर देतांना मेहबूब शेख यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, “वैचारिक दृष्ट्या ‘दीड फूट’ उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच ‘शिमग्याला’ झालेला आहे वाटतं, कोणाच्याही बद्दल दोन्ही हातांनी बोंबलत बसण्या पलीकडे काही कर्तृत्व नाही,” अशी टीका शेख यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!