Share

राऊतांसोबतच्या व्हायरल डान्स व्हिडीओवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. दरम्यान लग्नापूर्वी पार पडलेल्या संगीत कार्यक्रमातील संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तसेच या डान्सवरून यावरुन काहींनी टीकादेखील केली होती. याच टीकेला आता सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. विखे पाटील म्हणाले होते की,’एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?’

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधत असतांना सुप्रिया म्हणाल्या की,’तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता, बाहेरचं कुणीच नव्हतं. एखाद्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार?.’ तसेच ते आमच्या घरातल्या मुलीचे लग्न होते, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!