Share

‘क्रीडा विद्यापीठ गेले; तरी केंद्रीय क्रीडा विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबादेत आणू’, खा. भागवत कराडांची घोषणा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : ‘महाराष्ट्र शासनाने औरंगाबादेत घोषित केलेले क्रीडा विद्यापीठ अन्य शहरात गेले असले तरी आगामी काळात केंद्रीय क्रीडा विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करण्यात येईल. सध्या मणिपूर येथे देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेत होऊ शकत नाही. उपकेंद्र कसे होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’ राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आयोजित क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड बोलत होते.

या प्रसंगी माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा संघटकांशी संवाद साधताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, ‘खासदार असतानाच मी साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात नवनव्या सुविधा कशा येतील याविषयी पाठपुरावा करीत होतो. तत्कालीन क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनाही साई केंद्रात आमंत्रित करण्यात आले होते.

आगामी काळात यात आणखी काही सुविधांची भर पडणार आहे. साई केंद्रात नियमितपणे प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतु, दीर्घकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम साई केंद्रात सुरू होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगत डॉ. भागवत कराड म्हणाले, ‘साई क्रीडा केंद्राच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. यासाठी क्रीडा संघटनांनी योग्य प्रस्ताव तयार करून पाठवावा. प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून त्यासाठी क्रीडा संघटनांनी आता वेळ न दवडता आपल्या भागात गरजेनुसार क्रीडा सुविधा निर्माण करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!