Share

भाजप परभणी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंच्या गाडीवर हल्ला, कारवाईची मागणी

Published On: 

परभणी : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडी यांच्यातील वाद वाढत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य आणि त्या नंतर त्यांना पोलीसांनी अटक केल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यात आता भाजप युवा मोर्चाचे परभणीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या गाडीवर हल्ला झालाय. या हल्ल्यातील दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आलीय. या प्रकरणाची तक्रार पूर्णा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या संदर्भात युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले की, ‘जाहिर निषेध…! नांदेड हून परभणीला येत असताना कात्नेश्वर जवळ भाजपा युवा मोर्चाचे परभणी जिल्हाध्यक्ष श्री सुरेशजी भुमरे यांच्या गाडीवर झालेल्या भ्यांड हल्ल्याचा भाजप युवा मोर्चा निषेध करते. दोषीवर तांत्काळ गुन्हा दाखल करुन कारवाई झालीच पाहिजे..!’

हा हल्ला नेमका कोणी केला या बाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. मात्र, नुकताच नाशिकच्या भाजप कार्यालयावर हल्ला झाला होता. त्या नंतर आता भाजप जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!