Share

‘माझ्या नावात पटेल; सगळ्यांना पटेल अशीच कामे मी करणार’, प्रदेश सरचिटणीस अनिल पटेल यांची ग्वाही!

Published On: 

औरंगाबाद : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्यासारख्या साधारण अल्पसंख्यांकाच्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला प्रदेश समितीवर काम करण्याची जबाबदारी दिली. त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच माझे नाव पटेल असल्याने सगळ्यांना पटेल असेच काम मी करेन अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस अनिल पटेल यांनी पैठण येथे आयोजित सत्कार समारंभात दिली.

पैठण तालुका काँग्रेस व पैठण शहर काँग्रेस कमिटी तर्फे आढावा बैठक व सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री अनिल पटेल म्हणाले कि, मी कधीच कोणत्याच पदाची मागणी केली नाही. मला जे काही मिळाले ते नशिबाने अचानक मिळाले. प्रदेश अध्यक्ष नाना पटोलो यांनी माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजातील माणसाला प्रदेश समितीवर काम करण्याची संधी दिली. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या नावात पटेल असल्याने सर्वांना पटेल असेच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉ.कल्याण काळे, प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष विलासबापु औताडे, माजी आमदार नामदेव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी सर्व काँग्रेस पदाधिकारी यांनी प्रत्येक गावात बूथ कमिटी स्थापन करावी असे आव्हान केले. तर प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू औताडे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, महागाई, बेकारी, पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे गरीब जनतेला जीवन जगणे अवघड झाले आहे. माजी आमदार नामदेव पवार म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रेला जनतेने आशीर्वाद नाही तर शाप दिला पाहिजे. काँग्रेस पक्षाने अनेक विकास कामे केली. परंतु भारतीय जनता पार्टी फक्त नाव बदलत आहे. रवींद्र काळे, दिलीप भोसले यांनी सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!