Share

अनिल परबांना ईडीची नोटीस ; संजय राऊत म्हणाले, ‘ शाब्बास !…’

Published On: 

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत. याचे कारण आता परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबद्दलची माहिती खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

राऊत त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले कि, ‘शाब्बास ! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र’ असे मत त्यांनी मांडले आहे.

दरम्यान अनिल परब यांनीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी दबाव आणल्याचा आरोप भाजपनं एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केला आहे. अनिल परब यांचं एका पत्रकार परिषदेवेळी फोनवरील संवाद व्हायरल झाला होता. त्यावरुन अनिल परब यांनीच राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केला जात आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी याप्रकरणाची सीबीआय चौकशी देखील मागणी केली होती. आणि आता अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडल्यामुले आगामी काळात शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!