Share

मोठी बातमी ! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने धाडली नोटीस

Published On: 

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत. याचे कारण आता परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईनंतर भाजप आक्रमक झाले आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजपनेते प्रयत्नशील आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक भाजप नेत्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यातच आता परब यांना नोटीस आली आहे. अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे.

दरम्यान अनिल परब यांनीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी दबाव आणल्याचा आरोप भाजपनं एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केला आहे. अनिल परब यांचं एका पत्रकार परिषदेवेळी फोनवरील संवाद व्हायरल झाला होता. त्यावरुन अनिल परब यांनीच राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केला जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी याप्रकरणाची सीबीआय चौकशी देखील मागणी केली होती. आणि आता अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडल्यामुले आगामी काळात शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!