Share

सर्वांना सोबत घेऊन मनात कोणताही मतभेद न ठेवता काम करेल- पैठण शहराध्यक्ष निमेश पटेल

Published On: 

औरंगाबाद : ‘मी सर्वांना सोबत घेऊन मनात कोणताही मतभेद न ठेवता काम करेल. मला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, अमित देशमुख यांनी शहर अध्यक्षपदाची ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. या पदाचा उपयोग व सर्वसामान्यांच्या हितासाठी व काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी करेल’. अशी काही पैठण शहराचे नवीन शहर अध्यक्ष निमेश पटेल यांनी दिली.

पैठण तालुका काँग्रेस व पैठण शहर काँग्रेस कमिटीतर्फे आढावा बैठक व प्रदेश समितीवरील नवनियुक्त सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पैठण शहर अध्यक्ष पदाचा वाद मोठ्या प्रमाणावर गाजला. यावेळी काँग्रेसची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली. निमेश पटेल शहराध्यक्ष असतील. असे फर्मान प्रदेश समितीने काढले. त्यानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात बोलताना पटेल यांनी आपली भूमिका मांडली यावेळी पटोले, चव्हाण, देशमुख या राज्यस्तरीय नेत्यांचे नाव घेत त्यांनी आपल्याला हे पद दिल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र यावेळी त्यांनी इतर कोणत्याही नेत्याचे नाव घेणे मात्र जाणीवपूर्वक टाळले. तसेच जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांचे नाव न घेतल्याने उलटसुलट चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. पैठण शहर काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्ष पदावर नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे व निमेश पटेल या दोघांनी दावा केला होता. व दोघांकडेही शहराध्यक्ष पदाचे निवडीचे पत्र असल्याने खरा अध्यक्ष कोण याबाबत शहरात उलटसुलट चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता.

त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निमेश पटेल यांचीच नियुक्ती कायम असल्याचे घोषित केले. निमेश पटेल यांच्या नियुक्तीचे आदेश कायम केल्याने प्रदेश कमिटीने काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या अंतर्गत राजकारणाला चांगलाच लगाम लावला आहे. जिल्हाध्यक्षांचे प्रदेश कमिटीने कान टोचल्याची चर्चा काँग्रेसमध्ये रंगत आहे. पटेल यांच्या नियुक्तीबाबत प्रदेश काँग्रेसमध्ये अनेक शिफारसी आल्यावर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या शिफारशीनुसार निमेश पटेल यांच्या निवडीस मान्यता दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!