मुंबई : बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. आज ७ जुलै रोजी सकाळी ७.३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे वय ९८ होते. गेल्या काही दिवसापासुन दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे उपचारासाठी त्यांना २९ जुन रोजी मुंबई येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज ७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
दिलीप कुमार यांची लोकप्रियता प्रचंड होती. त्यांच्या अभिनयाने त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी कित्येक लोक उत्सुक असयाचे. असाच एक किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला आहे.
एका वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिलीप कुमार यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत शरद पवार म्हणाले, ‘दिलीपकुमार आपल्यात राहिले नाहीत. पण माझ्या नजरेसमोर त्यांच्या अनेक आठवणी आहेत. मी शाळेत असताना पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या जेजुरी इथं ‘नया दौर’ चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे असं आम्हाला समजले आणि हे कळताच शूटिंग बघण्यासाठी आम्ही सायकलवरून तिथं गेलो होतो. तेव्हा पहिल्यांदा दिलीप कुमार यांना लांबून पाहण्याची संधी मिळाली,’ असं म्हणत शरद पवारांनी जुन्याआठवणींना उजाळा दिला.
दरम्यान पवारांनी दिलीप कुमार याचे परदेशातील चाहत्यांबाबटचा देखील एक किस्सा सांगितला, ‘दिलीप कुमार यांची लोकप्रियता केवळ महाराष्ट्र किंवा देशापुरती मर्यादित नव्हती. परदेशातही ते लोकप्रिय आहे. दिलीप कुमार यांच्यासोबत एकदा आम्ही दक्षिण आशियामधील इजिप्त, सीरियामध्ये गेलो होतो. तिथं त्यांना पाहण्यासाठी तरुण मंडळी मोठी गर्दी करायचे’.
दिलीप कुमार यांच्यावर जुहू येथील कब्रस्थानात सायंकाळी पाच वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- HDFC बँकवर नॅशनल हाऊसिंग बँकेने केली मोठी कारवाई
- ‘भास्कर जाधव हे नरकासुरा सारखे आहेत’, नितेश राणेंचा प्रहार
- ‘बाजीराव ते कपील देव’ अष्टपैलु रणवीरचे ३६व्या वर्षात पदार्पण!
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- नारायण राणे होणार केंद्रीय मंत्री ?, दिल्लीहून आले तातडीचे बोलावणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

