Share

HDFC बँकवर नॅशनल हाऊसिंग बँकेने केली मोठी कारवाई

Published On: 

मुंबई : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी  बँकेत मोठे धोरणात्मक बदल होणार आहेत. याचा प्रभाव HDFC बँकेचे ग्राहक आणि संबंधित गोष्टींवर पडणार आहे. मात्र या बँकेवर नॅशनल हाऊसिंग बँके अर्थात NHB कडून कारवाई करण्यात आली आहे. NHB ने HDFC बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4.75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोरोनाकाळात HDFC बँकेकडून मोठ्याप्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले होते. बँकेने कर्ज म्हणून दिलेल्या रक्कमेचा आकडा 30 जूनपर्यंत 11.47 लाख कोटींवर पोहोचला होता. तर बँकेने वाटप केलेल्या होम लोनमध्येही 10.5 टक्क्यांची वाढ झाली होती. तर शेअर बाजारातील कंपनीचे एकूण मूल्य 8.26 लाख कोटी इतके आहे.

याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईतील सारस्वत सहकारी बँकला 25 लाख आणि एसव्हीसी सहकारी बँकेला 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यानंतर आता HDFC  बँकेवर देखील ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!