Share

‘भास्कर जाधव हे नरकासुरा सारखे आहेत’, नितेश राणेंचा प्रहार

Published On: 

नागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसांच्या अधिवेशनात देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून काही काळ सभागृहाचे कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. तर, या गोंधळानंतर असंसदीय शब्द वापरत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांच्या निलंबनाला मान्यता दिली.

या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. तर, भाजपच्या सर्वच नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, या कारवाईचे आता महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये पडसाद उमटत आहेत.

विधानसभेत गोंधळ घातल्यावरून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्यावरून भाजप चांगलेच आक्रमक झाला आहे. यावरूनच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. ‘आम्ही कोकणातले आहोत जाधवही कोकणातले आहेत. दशावतार असतात कोकणात. त्यात नरकासुर असतो. तो वेगवेगळे सोंग बदलतो. सोंगाड्याही असतो त्यात. जे जे भास्कर जाधवला ओळखतात त्याना माहीत आहे ते सोंगाड्या आहेत. ते नरकासुरासारखे आहेत. ते एकच सोंग कधीही ठेवत नाही. काल त्यांना कोणीही शिवी घातली नाही. कोणीही काहीही केलं नाही. पण तमाशातील सोंगड्या कसा असतो, नरकासुर कसा असतो. तसे हे भास्कर जाधव आहेत’. असा जोरदार टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

तर, ‘आमच्या सारखे लोक त्यांना चांगलं ओळखून आहे. ते काय काय करतात ते आम्हाला माहीत आहे, तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान एका सोंगाड्या माणसाने केला आहे. त्यांना काहीही झालं नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले का नाही? त्यांनी स्वत:चे कपडे का नाही फाडून घेतले. माझे बंधू निलेश राणे त्यांना चांगले ओळखतात, असं देखील नितेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!