🕒 1 min read
नवी दिल्ली- मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात 7 जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. या विस्तारात ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनोवाल, सुशील कुमार मोदी, दिलीप घोष, अनुप्रिया पटेल यांच्यासह इतर अनेक चेहरे मंत्रिमंडळात स्थान मिळवू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १९-२० नवीन नेत्यांमध्ये मनोज तिवारी, नारायण राणे, आरसीपी सिंग, संतोष कुशवाह, लॉकेट चॅटर्जी, जफर इस्लाम आणि इतर अनेक चेहरे यांचा समावेश असू शकतो अशी शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नारायण राणे यांचे नाव आघाडीवर आहे. राणे यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, शिवसेना एनडीएमध्ये असताना अवजड खाते हे शिवसेनेकडे देण्यात आले होते. राज्यात शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. याच वादाचा फायदा घेत मोदी सरकारकडून सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा एका प्रकारे प्रयत्न होणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं. शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलाने देखील भाजपची साथ सोडली. त्यामुळे दोन मंत्रिपदं रिक्त झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेलं मंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणेंची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
काल राणेंनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली होती. तुमचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे, असं राणे यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. असं काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्रं येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असं राणे यांनी हसत सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- ‘बाजीराव ते कपील देव’ अष्टपैलु रणवीरचे ३६व्या वर्षात पदार्पण!
- …अन् रैनानं स्वीकारलं कोहलीचं चॅलेंज ; पाहा मजेदार व्हिडीओ
- नारायण राणे होणार केंद्रीय मंत्री ?, दिल्लीहून आले तातडीचे बोलावणे
- निवड समिती अध्यक्षांच्या हट्टामुळे पृथ्वी शॉ इंग्लंड दौऱ्याला मुकला
- आयपीएल २०२१ मध्ये श्रेयस अय्यर करणार पुनरागमन ; दिल्लीच्या कर्णधारपदावर दिलं उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
