🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा हिट-मॅन रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी मेलबर्नमध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. रोहित संघात दाखल होताच सहकारी खेळाडूंनी टाळ्या वाजवून ‘हिटमन’चं स्वागत केलं. बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट एकॅडमी (एनसीए) येथे फिटनेस टेस्ट पास केल्यावर रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना झाला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्मा संघात दाखल झाल्याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री रोहितला क्वारंटाईन कालावधीत कसा होता याचा विचारताना दिसत आहे. संघात सामील झाल्यानंतर रोहितने भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना भेटून मिठी मारली.
सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडनीमध्ये कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. व हिटमॅन रोहित शर्मा देखील काही दिवसांपासून सिडनीमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. व रोहित शर्मा 4 टेस्ट मॅच मध्ये खेळणार का नाही यावर प्रश्न उपस्थित होत होते. अखेर रोहित 4 टेस्ट मॅच मध्ये खेळणार असून क्रिकेट चाहते खुश आहेत. रोहितच्या येण्याने टीम इंडिया आणखीन मजबूत होईल.
Look who's joined the squad in Melbourne ????
A warm welcome for @ImRo45 as he joins the team ????#TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/uw49uPkDvR
— BCCI (@BCCI) December 30, 2020
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय; परीक्षा देण्यासाठीच्या नव्या मर्यादा केल्या जाहीर
- पुणेकरांनो, ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठीचे महत्वाचे ‘हे’ दहा नियम पाळाच; अन्यथा…
- पुणेकरांनो, जाणून ‘घ्या’ थर्टी फर्स्टला होम डिलिव्हरीची नवीन वेळ
- सय्यद मुश्ताक अली टी-२० : पुणेकर राहुल त्रिपाठीच्या खांद्यावर महाराष्ट्राची धुरा
- भावा कसं… वजनात ! : ऋषभ पंतचं मॅथ्यू वेडला जबराट प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
