Share

पुणेकरांनो, जाणून ‘घ्या’ थर्टी फर्स्टला होम डिलिव्हरीची नवीन वेळ

Published On: 

पुणे : नववर्षाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना पुणेकरांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महानगरपालिकेने 31 डिसेंबरला खाद्यपदार्थांच्या घरपोच डिलिव्हरीवर निर्बंध घातले आहेत. पुणे महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री 10.45 पर्यंतच खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी सुरु राहील. त्यानंतर पुणेकरांना कोणतेही खाद्यपदार्थ घरपोच मिळणार नाहीत.

याशिवाय, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ तसेच बार 31 डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत. नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश जारी केला आहे.

ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

सुरुवातीला ३१ मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर जूनपासून टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली होती. राज्य सरकारने ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी पावले उचलले होते. या मिशन बिगिन अगेन ची नियमावली ३१ जानेवारी २०२१ मध्ये देखील कायम ठेवण्यात आली आहे. अशातच अतिउत्साही नागरिकांना आवर घालण्यासाठी राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!