Share

भावा कसं… वजनात ! : ऋषभ पंतचं मॅथ्यू वेडला जबराट प्रत्युत्तर

Published On: 

ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संघातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यादरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेड यांच्यात स्लेजिंग होताना दिसली.

दोघांमध्ये झाले असे की, प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या धुव्वादार शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावामधील २५ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला होता. यावेळी वेड स्ट्राइकवर असल्याने पंत त्याला डिवचण्याचा प्रयत्न करत होता. वेडने पहिला चेंडू खेळल्यानंतर पंत त्याच्याकडे बघून जोरात हसायला लागला. यावेळी वेड देखील पंतकडे बघून हसत म्हणाला, ‘तू स्वतःला मोठ्या स्क्रीनवर बघितलस का, तुझे वजन २० ते २५ किलो जास्त आहे ‘.

वेडच्या या विधानावर आता पंतने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मी आमच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीचा पुरेपूर आनंद लुटला. परंतु माझ्या मते वेडला थोडेफार संभाषण करायचे होते. कारण त्याला त्याच्या फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित करायचे होते. पण मला त्याला असे करू द्यायचे नव्हते. म्हणून मी त्याला जास्त वेळ माझ्या संभाषणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला.”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!