मुंबई : नुकत्याच बीसीसीआयने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात रोमांचक सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा घोषित केल्या आहेत. १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. ६ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल.
आगामी सय्यद मुश्ताल अली टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्राने आपल्या संघाची घोषणा केली असून पुण्याच्या राहुल त्रिपाठीकडे महाराष्ट्राचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. राहुल त्रिपाठीव्यतिरीक्त केदार जाधव, ऋतुराज गायकवाड यांनाही संघात स्थान मिळालं आहे.
अशी आहे महाराष्ट्राची टीम
राहुल त्रिपाठी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, नौषाद शेख, केदार जाधव, रणजित निकम, अझीम काझी, निखील नाईक (यष्टीरक्षक), विशांत मोरे (यष्टीरक्षक), सत्यजित बच्छाव, तरणजित सिंग धिल्लाँन, शम्सुझ्मा काझी, प्रदीप दधे, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, दिव्यांग हिंगणकर, राजवर्धन हांग्रेकर, जगदीश झोपे, स्वप्नील गुगले, धनराज परदेशी, सनी पंडीत
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय; परीक्षा देण्यासाठीच्या नव्या मर्यादा केल्या जाहीर
- पुणेकरांनो, ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठीचे महत्वाचे ‘हे’ दहा नियम पाळाच; अन्यथा…
- जिथं ताकद, तिथं स्वबळ; राष्ट्रवादीने पहिल्यांदाच दिला स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा!
- आता उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांसाठी शिवसेना काँग्रेसला देणार मैत्रीची हाक?
- पुणेकरांनो, जाणून ‘घ्या’ थर्टी फर्स्टला होम डिलिव्हरीची नवीन वेळ


