पुणे : २०२० हे वर्ष संपायला अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. हे सरतं वर्ष अनेक संकटांचं ठरलं असतानाच येणारे वर्ष अधिकाधिक चांगलं जावं अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. यंदा नववर्षाच्या निर्बंध आले असून नागरिकांनी सतर्कता बाळगून साधेपणाने सेलिब्रेशन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील उद्याच्या सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
काय आहेत सेलिब्रेशनसाठीचे १० नियम?
१) करोनाच्या अनुषंगाने दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व १ जानेवारी २०२१ रोजी नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घऱाबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरी साधेपणे करावे.
२) नागरिकांनी ३१ डिसेंबर दिवशी पुणे महानगरपालिकेच्या श्रेत्रामधील उद्याने, मैदाने, पर्यटनस्थळे तसेच रस्त्यावर अशा सर्वाजनिक ठिकाणी मोठ्या संख्यने गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देऊन आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.
३) करोनाच्या पार्श्वभूमीवर ५० वर्षांवरील नागरिकांनी तसेच १० वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे.
४) कोणत्याही प्रकार गर्दी आकर्षित होईल अशा प्रकारचे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात येवू नये.
५) पुणे महानगरपालिका श्रेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टोरंट तसेच बार ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत.
६) सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टोरंट रात्री पावणे अकराला बंद होतील. त्याचप्रमाणे होम डिलेव्हरीची सुविधाही पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहे. होम डिलेव्हरीची सेवा पावणे अकरानंतर उपलब्ध नसेल.
७) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
८) फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येवू नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.
९) यासंदर्भातील आदेश वर मार्गदर्शक सुचना पुढील नवीन आदेश जारी करण्यात येईपर्यंत लागू असतील.
१०) करोना प्रतिबंधासाठी पुणे महापालिकेने यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश आणि सूचना पुढील आदेश मिळेपर्यंत पुणे मनापा क्षेत्रासाठी लागू असतील.
हे नियम न पाळल्यास नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. खास अधिकचा फौजफाटा देखील पुणे पोलिसांनी तयार ठेवला असून नववर्षाचं स्वागत नियमांचं पालन करूनचं करावं असं आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा नववर्षाचं स्वागतच दंड व कायदेशीर कारवाईने होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे, त्यांना महाराष्ट्र भूषण द्यावा’
- मुंबईकरांनो, ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी जेवण हवं असेल तर साडेनऊच्या आधीच ऑर्डर द्या!
- जिथं ताकद, तिथं स्वबळ; राष्ट्रवादीने पहिल्यांदाच दिला स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा!
- आता उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांसाठी शिवसेना काँग्रेसला देणार मैत्रीची हाक?
- केंद्रीय मंत्र्यांनीही घेतला शेतकरी आंदोलनातील लंगरमधील भोजनाचा आस्वाद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

