लखनऊ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरूच असून, जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनानं हातपाय पसरले आहेत. सगळीकडे रुग्ण आणि नातेवाईकांची बेड आणि ऑक्सिजनसाठी धडपड सुरू असून, आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी रुग्णवाढ सोमवारी समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अलहाबाद उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. उच्च न्यायालयाने करोनाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यातील पाच मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउन करण्याचे आदेश दिले होते. यानंतर या निर्णयाला स्थगिती देखील देण्यात आलेली होती. परंतु उत्तर प्रदेशमधील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता उत्तरप्रदेशमधील योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
इस वैश्विक महामारी के विरुद्ध संयम एवं धैर्य हमारा सबसे बड़ा हथियार है।
रात्रि 08 बजे से प्रातः 07 बजे तक प्रदेशव्यापी 'कोरोना कर्फ्यू' प्रभावी है। इसे सफल बनाने में प्रत्येक प्रदेशवासी अपनी सहभागिता सुनिश्चित करे।
बहुत आवश्यकता हो, तभी घर से बाहर निकलें।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 20, 2021
उत्तरप्रदेशात आठवड्यात दोन दिवस शनिवार आणि रविवार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यूपी सरकारच्या मते, आता दोन दिवस संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असणार आहे. याशिवाय आजपासून ज्या जिल्ह्यांमध्ये ५०० हून अधिक बाधित रूग्ण असतील, तेथे नाईट कर्फ्यूदेखील लागू केला जाईल. राज्यात शनिवार व रविवार लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या वेळेत लागू असेल. त्याचबरोबर रात्रीच्या कर्फ्यूची वेळही रात्रीच्या ८ ते सकाळी ७ अशी असणार आहे.दरम्यान, या शनिवार व रविवार लॉकडाऊन दरम्यान विनाकारण घराबाहेर पडायला मनाई असेल तर केवळ आवश्यक क्षेत्राशी संबंधित लोकांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना लसीकरण, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांनाही सूट देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मृत्यूनंतरही यातना संपेना! अंत्यविधीच्या प्रक्रियेत नातेवाईकांची फरफट
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू


