Share

१८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया

Published On: 

मुंबई : कोरोनाचा वाढता धोका पाहता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय नेते आणि वैद्यकीय तज्ञांनी केली होती. लसीकरण ही कोरोनाची साखळी तोडण्याचा एकमेव पर्याय असल्याने आता केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लस उत्पादकांनी ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. शासकीय रुग्णालयात कोरोना लस मोफत असेल तर खासगी रुग्णालयात तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतील.

लस घेण्यासाठी काय कराल?
सर्वप्रथम cowin.gov.in या वेबसाईटला भेट द्या
येथे आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर भरा
तुम्हाला ओटीपी मोबाईलवर मिळेल, नंबर टाकून नोंदणी करा
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लसीकरणासाठी दिवस आणि वेळ ठरवू शकता
हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही लस घेऊ शकता.
यावेळी तुम्हाली रेफ्रन्स आयडी मिळेल, याच्या माध्यमातून तुम्हाला लस सर्टिफिकेट मिळू शकते.

नोंदणी करताना काय आवश्यक?
आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, वाहन परवाना, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्ड, पासपोर्ट, बँक/पोस्ट ऑफिसकडून जारी करण्यात आलेले पासबुक, पेन्शन डॉक्युमेंटॉसर्विस आयडेन्टी कार्ड (केंद्रीय/राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले) या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा पाहिजे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!