औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या धडकी भरवणारी तर आहेच. शिवाय दररोज होणाऱ्या मृत्यूंचीही संख्या वाढतच आहे. मात्र कोरोना रुग्णावर उपचार होतांना आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या आप्तेष्टांना मोठ्या प्रमाणावर हाल सोसावे लागत आहेत. आपला माणूस गमावल्याचे दु:ख एकिकडे तर याच परिस्थितीत नातेवाईकांना पोलीस स्टेशन ते महानगरपालिका ते घाटी अशा फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांसाठी प्रशासनाने एक खिडकी योजना सुरु करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना तर अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील महिलेचा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. जवळच्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. मात्र त्याआधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पत्र घ्यावे लागले. त्यानंतर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागात जाऊन कागदपत्रे जमा करण्यासाठी सांगितले. मात्र लॉकडाऊन असल्याने सर्व दुकाने बंद होती.
अशावेळी मनपाला नातेवाईकांनी झेरॉक्स देण्याची विनंती केल्यानंतरही त्यांना तेथून हाकलण्यात आले. शेवटी फरफटीनंतर एका ठिकाणाहून झेरॉक्स मिळाले. तर त्यानंतर अँम्ब्युलन्ससाठी जास्तीचे पैसे, डिझेल मिळवण्यासाठी पायपीट आणि शेवटी स्मशानभूमीतही लागणाऱ्या सामानाचे जास्तीचे पैसे मोजावे लागले. प्रशासनाला मृत व्यक्तीच्या मृतदेहाची व नातेवाईकांची हेळसांड थांबवायची असेल तर कागदपञाची झेराॅक्स काढण्यासाठी इतर ठिकाणी झेराॅक्स दुकान उघडे आहे की नाही हे बघण्याची नातेवाईकांना गरज पडु नये यासाठी महानगरपालिका कार्यालयात झेरॉक्स मशीन ठेवणे बंधनकारक करावे.
व तेथेच मोफत झेराॅक्स सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. जेणेकरून कागदपञाची झेराॅक्स लगेच उपलब्ध झाली तर नातेवाईकांना अंत्यविधी राञी अपराञी केव्हाही करता येईल. शासकीय रूग्णालयाच्या वतीने मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी चोवीस तास मोफत शासकीय अॅब्युलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद मनपा निवडणूक नाट्यात आज येणार महत्त्वपूर्ण ‘ट्विस्ट’!
- देशात मोदी ॲक्ट आला आहे का?
- लातूर जिल्ह्यातील पत्येक तालुक्यात १०० खाटांचे ऑक्सिजन सुविधेसह कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यात यावे – आ. पवार
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- संचारबंदी असतानाही वैभव नाईक यांनी कणकवलीत घेतला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम


