पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे.
पुण्यात विकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. आता सोमवारी सकाळी ७ पर्यंत काय निर्बंध असतील. कारण राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विकेंड लॉकडाऊनमध्ये काय राहणार सुरू
- दूध विक्री (सकाळी ७ ते ११)
- घरेलू कामगारांची कामे, रुग्ण सेवेसाठी जाणारे कामगार, वाहनचालक (ड्रायव्हर), स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणारे
- लसीकरण सुविधा
- क्लिनिक, औषध विक्री
- स्विगी, झोमॅटोवरून पार्सल
- अत्यावश्यक सेवेशी संबंधित उद्योग
- अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि घरेलू कामगार, प्रवासी, लसीकरणाला जाणारे नागरिक यांच्यासाठी पीएमपीची वाहतूक
- अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक
- रिक्षा, कॅब
- बांधकाम साईटस (मजूर तेथे राहत असतील तर)
- वृत्तपत्र छपाई आणि वितरण
विकेंड लॉकडाऊनमध्ये काय राहणार बंद
- किराणा, मटण, चिकण दुकाने
- भाजी मंडई,
- हॉटेल्स, रेस्तराँ, सिनेमागृहे, थिएटर, मॉल
- चित्रपट, मालिकांचे शूटिंग
- सलून, ब्यूटी पार्लर, जीम
- मैदाने, उद्याने, क्रिडांगणे
- खासगी कार्यालये
- सर्व प्रकारची खासगी वाहतूक
- रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स
- शाळा, कॉलेज खाजगी क्लासेस
- मद्य वितरण
- चष्म्याची आणि सर्व प्रकारची दुकाने
महत्वाच्या बातम्या
- नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून लातूर पोलिसांनी वसूल केला सहा लाखांचा दंड
- शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मनपाने केले ‘असे’ नियोजन!
- घाबरु नका , गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे व्हॉटस्ॲपद्वारे समुपदेशन
- पालकमंत्री हसन मुश्रीफांना जिल्ह्यात आणा आणि ५ हजारांचं बक्षीस मिळवा
- ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश


