Share

ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Published On: 

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारडून कडक निबंध देखील लागू केलेले आहेत.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाही, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली. त्यांनी सध्याच्या ऑक्सिजन साठा, निर्मिती आणि पुरवठ्याची माहिती घेतली आहे.

पंतप्रधानांना सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. राज्य आणि वाहतूकदारांना ऑक्सिजनची ने-आण करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असं आश्वासन दिल्याचं मोदींना सांगण्यात आलं. शिफ्टमध्ये ड्रायव्हर्सची ड्युटी लावून २४ तास टँकरसह सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर सिलेंडर भरले जाणाऱ्या प्लांटमध्ये २४ तास काम सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे.

पंतप्रधानांनी कोरोनाने सर्वाधिक त्रस्त असलेल्या 12 राज्यांमध्ये पुढील 15 दिवस ऑक्सिजन पुरवठा कसा होईल याची माहिती घेतली. प्रत्येक ऑक्सिजन प्लांटची क्षमता वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या टँकर्सवर कोणतेही निर्बंध घालू नका, असं पंतप्रधानांनी मोदी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मतं आहे. तज्ञांच्या याच मताला लक्षात घेत केंद्र सरकारने आणखी एका कोरोना लशीचा मार्ग मोकळा केला आहे. रशियन कोरोना लशीला भारतात हिरवा कंदील मिळाला आहे. रशियाच्या स्पुटनिक V (Sputnik V) कोरोना लशीला भारतात परवानगी मिळाली आहे. या लशीच्या आपात्कालीन वापरला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!