औरंगाबाद : उन्हाळ्याच्या दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे पाण्याची मागणी वाढलेली दिसत आहे. तर दुसरीकडे जायकवाडी धरणातील महापालिकेच्या उपसा यंत्रणेतून पाण्याचा उपसाही कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे यंदाही पालिकेने एप्रिलअखेर जायकवाडीतील पालिकेच्या पंपिंग स्टेशनवरील एक अतिरिक्त पंप सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आवश्यक दुरूस्तीची कामे केली जात असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.
सध्यस्थितीत औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून १०० एमएलडी क्षमतेची नवीन व ५६ एमएलडी क्षमतेची जुनी अशा दोन योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही योजनांद्वारे सध्या रोजचा १२० एमएलडी पाण्याचा उपसा केला जात आहे. मात्र उन्हाळ्यामुळे आगामी काही दिवसांत शहरातून पाण्याची मागणी वाढणार आहे. दुसरीकडे जायकवाडी धरणातूनही जलपातळी जसजशी खोलवर जाईल, त्या प्रमाणाधत पाण्याचा उपसाही घटत जाणार आहे.
याविषयी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले की, शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी येथील पालिकेच्या पंपिंग स्टेशनवरील नवीन शंभर एमएलडी क्षमतेच्या पाणीपुरवठा योजनेवरील सहाव्या पंप सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी आवश्यक दुरूस्तीची कामे हाती घेतली आहे. सध्या नवीन योजनेवरील पाच आणि जुन्या योजनेवरील दोन अशा सात पंपांद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणीख एक पंप सुरू केला जाईल.
जायकवाडीतून सध्या रोजचा १३५ एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. त्यापैकी फारोळा येथील जलशुद्धीकरण आणि गळतीतून शहरातील नक्षत्रवाडीपर्यंत १२० एमएलडी पाणी येते. त्यानंतर संपूर्ण शहरात ८५ एमएलडीच पाणी वितरित होते. शहरात जुन्या एसीच्या जलवाहिन्या असल्याने त्यांना जागोजागी छोट्यामोठ्या गळत्या लागलेल्या आहेत. त्यातून बरेच पाणी वाया जाते, असे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
- गुप्त धनाच्या लालसेपोटी ‘या’ परिसरात उत्खनन
- खळबळ! सचिन वाझे आणखी दोघांचे करणार होता एन्काऊंटर, ‘या’ मोठ्या व्यक्तीचे वाचले प्राण
- कोविड सेंटरचे व्यवस्थापन कोलमडले, सुनिल केंद्रेकरांनी लक्ष देण्याची मागणी
- ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली दिशाभूल की त्यांचीच दिशाभूल?


