Share

घाबरु नका , गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे व्हॉटस्ॲपद्वारे समुपदेशन

Published On: 

औरंगाबाद :  गृह विलगीकरणात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या शंकांचे निरसन आणि समुपदेशन आता व्हॉटस्ॲपद्वारे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा ग्रुप जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वार्धक्यशास्त्र विभागाच्या मदतीने गृह विलगीकरणामधील रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त संबंधीत रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

गृह विलगीकरण केलेल्या रुग्णांना काही अडचणी असतील तर त्या https://chat.whatsapp.com/K1YoFNluy5kAV2nNih3tWi या लिंकला कॉपी करुन व्हाटस् ग्रुपला सहभागी होऊ शकता. आणि या बाबत मॅसेज देखील पाठवू शकता. सकाळी  8 ते रात्री 8 पर्यंत डॉक्टरांना जसा जसा वेळ मिळेल तसे तसे प्रश्नांना उत्तरे देण्यात येणार आहेत. रुग्ण या ग्रुपमध्ये दहा दिवसांपर्यंत सहभागी होऊ शकतात. रुग्णांवर उपचार व काळजी त्यांचे स्वत:चे मुळ डॉक्टर ज्यांनी त्यांना गृहविलगीकरणाचा सल्ला दिला आहे, तोच घ्यावा लागणार आहे.

या व्यतिरिक्त रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांना आरोग्य, औषधोपचार तसेच काही माहिती असल्यास, शंका निरसन करावयाचे असल्यास ते या ग्रुपवर करण्यात येणार आहे. हा सेवाभावी ग्रुप फक्त आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि योग्य माहिती देण्यासाठी या ग्रुपची निर्मीती केली आहे. असे आवाहन देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या वार्धक्यशास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!