Share

नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून लातूर पोलिसांनी वसूल केला सहा लाखांचा दंड

Published On: 

लातूर: राज्यात तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच कोरना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अजूनही म्हणावे तसे नियंत्रण अद्याप होऊ शकले नाही. आता राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असली तरीही नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत, याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून आत्तापर्यंत ६ लाख दंड आकारण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे, कडक संचारबंदी असली तरी येथील नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती तसेच आस्थापनांवर १ एप्रिल पासून ते १५ एप्रिल पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत लातूर पोलीस व महानगपालीकेकडून आत्तापर्यंत ६ लाख ३९ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनाच्या या वाढत्या साखळीला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सरकार तसेच स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन येथील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!