Share

पालकमंत्री हसन मुश्रीफांना जिल्ह्यात आणा आणि ५ हजारांचं बक्षीस मिळवा

Published On: 

अहमदनगर : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारडून कडक निबंध देखील लागू केलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित दुकानेही बंद ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.

विशेष म्हणजे कोरोनाला रोखण्यासाठी शासन स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक जिल्ह्यांची पालकमंत्री आपल्या भागात तळ ठोकून आहेत. पण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यात फिरकलेच नसल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार पोस्टरबाजी केली आहे.

कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. इतर जिल्ह्यातील पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कार्यरत आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात फिरकायला तयार नाहीत. त्यामुळे मनसेने जो कोणी पालकमंत्र्यांना जिल्ह्यात घेऊन येईल, त्यांना ५००१/- रुपये बक्षीस ठेवले आहे. विशेष म्हणजे त्याचे पोस्टर्सही अहमदनगरहून मुंबई आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटीला तसेच शहरातील रिक्षांवर मनसेकडून लावण्यात आले आहेत. मनसेच्या वतीने जिल्हा सचिव नितीन भुतारे आणि कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. यामुळे आता तरी हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्यामध्ये जाऊन पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या समजून घेणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!