Share

‘लग्नाचा दिवस आयुष्यातील आजवरचा सर्वात चांगला दिवस’ ; सामन्यापूर्वी संजनानं घेतली बुमराहची मुलाखत

Published On: 

मुंबई : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना एक दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या सामन्यासाठी भारताने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून पाच वेगवान गोलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे.

या फायनलपूर्वी टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची मुलाखत त्याची पत्नी संजना गणेशननं घेतली आहे. या मुलाखतीदरम्यान, पत्नी संजनाने  बुमराहाला आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलतं केलं आहे. संजना ही टीव्ही अँकर आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच संजनाने बुमराहची मुलाखत घेतली आहे. आयसीसीनं (ICC) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही मुलाखत शेअर केली आहे.

बुमराहनं आपल्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला आहे. लहापानापासून ते आता पर्यंतचा संपूर्ण क्रिकेट प्रवास त्याने या मुलाखतीतून सांगितला आहे. त्याचबरोबर त्याने लग्नाचा दिवस हा आयुष्यातील आजवरचा सर्वात चांगला दिवस असल्याचं म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!