औरंगाबाद : जुन्या शहरातून दुचाकी लंपास करून फायनान्स कंपनीच्या असल्याची थाप मारून लोकांना विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केलेल्या ३४ दुचाकीपैकी २२ दुचाकी बुधवारी (दि.१६) पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आल्या.
सिटीचौक पोलिसांनी २४ मे रोजी शहागंज भाजीमंडईतून दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गौसखा कालेखा पठाण (वय ३५, मूळ रा. नाणेगाव, ता. सिल्लोड, ह.मु. ब्रिजवाडी) व नवाबखा उस्मानखा पठाण (वय ४०, रा. वडीगोद्री, ता. भोकरदन, जि. जालना) यांना अटक केली होती. अटकेत असलेल्या दोघांच्या ताब्यातून सिटीचौक पोलिसांनी चोरीच्या ३४ दुचाकी जप्त केल्या होत्या. जप्त केलेल्या ३४ दुचाकीपैकी २२ दुचाकी बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या हस्ते २२ दुचाकी मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आल्या.
यावेळी उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, सिटी चौक ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार, बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे आदींची उपस्थिती होती. सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक के. डी महांडुळे व त्यांच्या पथकातील जमादार खैरनार, संजय नंद, संदीप तायडे, शेख, माजिद पटेल, देशराज मोरे, संतोष शंकपाळ, गायकवाड आदींच्या पथकाने चोरट्याच्या ताब्यातून ३४ दुचाकी जप्त केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- ‘….तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावेच लागेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

