मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. शासनाकडून आकड्यांची लपवाछपवी सुरु असल्याचा देखील आरोप वारंवार होत असतो. राज्य सरकारच्या संकेतस्थळावर जिल्हानिहाय कोविड संदर्भातली माहिती ही अपूरी असून सर्वसामान्य जनतेला आजच्या घडीला जी माहिती गरजेची आहे ती माहिती देण्यात पारदर्शकता का नाही, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी यांनी नुकतेच मांडलेले काही तथ्य विचारात घेतले तर शासनाचा कारभार कसा सुरु आहे याची कल्पना येते. आजमितीला राज्यात जिल्हानिहाय कोरोनाचे किती रूग्ण आहेत, किती रूग्णालयात किती खाटां उपलब्ध आहेत, मृतांची संख्या काय आहे अशी अधिकृत माहिती परिपूर्ण स्वरूपात सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही आहे.
विशेष म्हणजे या संकेतस्थळावर 36 जिल्हापैकी पाच जिल्ह्यांचे संकेतस्थळे सुरूच नाहीत. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सातारा आणि जळगाव जिल्ह्यांचा समावेश आहे. आज एक-दीड वर्ष झाले अजुनही ही संकेतस्थळे सुरू केलेली नाहीयेत मग राज्य सरकारला या जिल्ह्यातली माहिती कोणत्या पद्धतीने मिळते? या पाच जिल्ह्यातली संकेतस्थळे सुरू करण्यासंबंधित सरकारकडून का पाठपूरावा केला जात नाही, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
केवळ 20 जिल्ह्यातल्या कोविड डॅशबोर्ड वर अद्दयावत माहिती उपलब्ध आहे. मात्र, या सर्व जिल्ह्यातील माहिती गोळा करून ती सादर करण्यामध्ये एक समान अशी पद्धत ठेवलेली नाहीये. त्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यांची अपूरी माहिती आढळून येते. त्यासाठी महसूल विभागाकडून आवश्यक असलेल्या माहितीचा एक समान आराखडा तयार करून देणे आवश्यक होते मात्र त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. केवळ 13 जिल्ह्यांच्याच संकेतस्थळावर मृतांचे आकडे दिसून येतात. एकूणच राज्य सरकारमध्ये जो समन्वयाचा अभाव सर्वत्र दिसून येतो तोच समन्वयाचा अभाव संकेतस्थळावरील कामातून ही दिसून येतो.
जिल्हाधिकांऱ्याकडून जी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला दिली जाते तिच माहिती माध्यमांना दिली जाते. हि माहिती जिल्हाधिकारी संकेतस्थळावर का देत नाहीत की यामध्ये काही लपवाछपवी केली जाते, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आता या सर्व आरोपांना आरोग्यमंत्री आणि प्रशासन नेमकं काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- ‘….तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावेच लागेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- ‘भाजपच्या त्या सो कॉल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी, आम्ही पुन्हा मैदानात येऊ’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

