Share

‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Published On: 

मुंबई : कोरोना कालावधीत अनेक कारणांमुळे शाळा सुटलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू असून, त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कार्यरत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता यालाच प्राधान्य देऊन आरोग्य विभागाच्या समन्वयाने येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती बघून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जूनपासून शाळा सुरू होतात. त्या प्रमाणे राज्यातील काही शाळा ऑनलाइन सुरू झाल्या असून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात वर्षा गायकवाड यांनी बुधवारी स्वागत केले. विद्यार्थ्यांसाठी पहिले १५ दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली.

विविध माध्यमांतून शिक्षण पोहोचवले

कोरोनामुळे शाळा सुरू करताना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. गेल्या वर्षी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. व्हॉट्सअप, युट्यूब यासोबतच दूरदर्शन आणि इतर माध्यमांचा वापर करून शिक्षण पोहोचवण्यात आले. यासाठी शिक्षकांसह विद्यार्थी मित्र आणि इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून दिले.

यंदा ब्रीज कोर्सची सोय

या वर्षी ब्रीज कोर्सची सोय उपलब्ध केली आहे. यात दहावीच्या विद्याथ्र्याला नववीचा अभ्यासक्रम शिकून दहावीसाठी लागणारा पाया मजबूत केला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!