इंग्लंड : भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) दरम्यान टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. एका प्रसिद्ध वहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, लक्ष्मण यांनी कोणता संघ मजबूत स्थितीत आहे हे सांगितले आहे.लक्ष्मण यांच्या मते टीम इंडियासह न्यूझीलंडचा संघही खूप मजबूत आहे आणि अशा परिस्थितीत डब्ल्यूटीसी फायनल रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
लक्ष्मण म्हणाले की, हा एक रोमांचक सामना आहे. गेल्या दोन वर्षांपासून डब्ल्यूटीसीचे सामने होत आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी बजावली. न्यूझीलंडचा संघही मजबूत असून अंतिम सामन्यात रोमांचक खेळ होणे अपेक्षित आहे.
अंतिम सामन्यात सिराज आणि इशांत यांच्यात टीम इंडियाने कोणाला संधी द्यावी? यावर लक्ष्मण म्हणाले की, टीम इंडिया भाग्यवान आहे की टीम मध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. सामना जिंकण्याची शक्ती ईशांत आणि सिराज दोघांमध्ये आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सिराजने चांगली गोलंदाजी केली. पण अंतिम सामन्यात काही बाबींचा विचार करता मी ईशांतला संघात ठेवेल. मी तीन वेगवान गोलंदाज व दोन फिरकी गोलंदाजांसह जाईल.
व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, रीषभ पंत ६ व्या क्रमांकावर खेळू शकतो. जडेजा 7 व्या क्रमांकावर. जडेजाने महत्त्वपूर्ण प्रसंगी धावा केल्या आहेत. तो फलंदाजीद्वारे सामने जिंकू शकतो. आणि अश्विन 8 व्या क्रमांकावर खेळू शकतो. अश्विन हा एक उत्तम खेळाडू असून त्याने ऑस्ट्रेलियामध्येही हे दाखवून दिले. स्टीव्ह स्मिथ सारख्या फलंदाजाला त्याने दौर्यावर त्रास दिला होता.
या माजी क्रिकेटपटूने सांगितले की केन विल्यमसन आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू आहेत. एक आक्रमक आहे आणि एक शांत कर्णधार. हे रोल मॉडेल आहेत. दोघांनाही डब्ल्यूटीसी फायनल जिंकण्याची आस आहे.
अलीकडील मालिकेत असे दिसून आले आहे की, टीम इंडिया पहिली कसोटी हरवते, पण अंतिम फेरीत पुनरागमन करण्याची शक्यता नाही. यावर लक्ष्मण म्हणाला की ही टीम इंडियाची कमजोरी आहे. पहिल्या कसोटीत ती चांगली कामगिरी करत नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हा प्रकार पाहायला मिळाला. आता अशा परिस्थितीत कोहली आणि प्रशिक्षक शास्त्री यांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यांना खेळाडूंना संदेश द्यावा लागतो. पहिल्या बॉलपासून खेळाडूंना चालू करावे लागेल.
सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचा दृष्टिकोन काय असावा ..? यावर लक्ष्मण म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये तू चांगला पाऊल ठेवला पाहिजे. चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. हलके हातांनी खेळावे लागेल. आपला ऑफ स्टंप कोठे आहे हे आपल्याला माहित असले पाहिजे. जर हे माहित असेल तर हे दोन्ही फलंदाज चांगले प्रदर्शन करू शकतात. दोघेही चांगले खेळाडू असून आम्हाला आशा आहे की दोघेही चांगली फलंदाजी करतील.
महत्वाच्या बातम्या
- ना कॉल, ना ओटीपीची मागणी; थेट खात्यातून ९३ हजार काढत कंपनीतील अधिकाऱ्याला गंडा
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- कोविड संदर्भातली माहिती पारदर्शकरित्या जनतेला का दिली जात नाही?
- ‘त्या’ चोरट्यांकडून जप्त केलेल्या ३४ पैकी २२ दुचाकी पोलिस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांना परत
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

