मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असल्यामुळे केंद्र सरकार ने संसदेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा करावा लागेल. मात्र त्यासाठी केंद्राला फक्त मराठा समाजाचा विचार करावा लागणार नाही तर देशभरातील सर्व क्षत्रिय समाजाचा विचार करून क्षत्रिय समाजातील गरिबांना आरक्षणाचा कायदा करावा लागेल त्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रीय मराठा पार्टी चे अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांना दिले.
मुंबईत बांद्रा येथील संविधान निवासस्थानी राष्ट्रीय मराठा पार्टी चे अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार ने कायदा करावा या मागणीचे निवेदन दिले. मराठा समाजाच्या आरक्षणाला दलित पँथर च्या काळापासून आपण पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून ही माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे असं देखील त्यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लोकसभेत सर्वप्रथम मी मागणी केली होती. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण द्यावे ही मागणी आहे. सर्व पक्षीय बैठकीत पंतप्रधानांसमोर मी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विषय मांडला होता. राज्यसभेत ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्तीचे विधेयक संसदेत मंजूर करण्याची सूचना मांडली होती. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे असे आश्वासन रामदास आठवले यांनी अंकुशराव पाटील यांना दिले.
दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणा च्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या असल्या तरी महिनाभरात प्रशासनानं त्यावर कार्यवाही केलेली नाही, असं पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करू, असा इशारा संभाजीराजे यांनी पत्रातून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त
- पंतप्रधान मोदी वाराणसीत दाखल, १५०० कोटींच्या कामांचे लोकार्पण करणार
- पंतप्रधान मोदी युवकांना म्हणाले, ‘ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल’
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल


