Share

पंतप्रधान मोदी वाराणसीत दाखल, १५०० कोटींच्या कामांचे लोकार्पण करणार

Published On: 

🕒 1 min read

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते १५०० कोटींहून अधिक रुपयांच्या अनेक विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. आज गुरुवारी सकाळा मोदी यांचे वाराणसी विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर मोदी यांचे स्वागत केले.

आगामी वर्षात उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय. उत्तर प्रदेशात भाजपच्या विधासनभा निवडणूक मोहिमेची सुरुवात म्हणून पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे पाहण्यात येत आहे. या निमित्तानं यंदाच्या वर्षात आपल्या मतदारसंघात मोदींचा हा पहिलाच दौरा आहे.

या दौऱ्यात मोदी बनारस हिंदू विद्यापीठातील १०० बेड्सच्या एमसीएच विंगचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर गौदौलियामधील एक बहुस्तरीय पार्किंग, गंगा नदीतील पर्यटनाच्या विकासाठीच्या नवीन रो-रो नौका आणि वाराणासी-गाजीपूर महामार्गावरील तीन लेनच्या फ्लाय ओव्हरसोबतच विविध कामांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!