नवी दिल्ली : आज दि.१५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. डिजिटल माध्यमाद्वारे केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ‘आजमितीला कमवते झाल्यानंतर शिकायचे विसरून चालणार नाही. सध्याच्या घडीला कौशल्य आणि स्किलला खूप मागमी आहे. ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल. ही बाब युवकांवर आणि एखाद्या देशावरही लागू होते, असे मोदी म्हणाले.
आज ये जरूरी है कि Learning आपकी earning के साथ ही रुके नहीं।
आज दुनिया में स्किल्स की इतनी डिमांड है कि जो skilled होगा वही Grow करेगा।
ये बात व्यक्तियों पर भी लागू होती है, और देश पर भी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 15, 2021
तरुणांच्या नव्या पिढीचा कौशल्य विकास, एक राष्ट्रीय गरज असून आत्मनिर्भर भारताचा एक खूप मोठा आधार आहे. गेल्या ६ वर्षात बनलेल्या नव्या संस्थांच्या पूर्ण ताकदीने आपल्याला स्किल इंडिया मिशनला गती द्यावी लागेल असे आवाहन मोदी यांनी केले.
युवकांचे कौशल्य हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहे. जगासाठी भारताकडे स्मार्ट आणि कौशल्यवान मनुष्यबळ आहे. स्किल इंडियाचे ध्येय आपल्याला नव्याने चालवायचे आहे. कौशल्याद्वारे स्वत: आणि देशाला स्वावलंबी बनवले पाहिजे. मागील सहा वर्षांमध्ये अनेक तरुण पुढे आले. नवीन संस्था, कंपन्या तयार झाल्या. मागील सहा वर्षांच्या आधारावर तरुणांच्या स्किलच्या आधारावर आपल्या स्किल इंडिया मिशनला नक्कीच गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
- ‘महानायक अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाची ‘प्रतिक्षा” ; बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर
- आयपीएलपुर्वी दिल्ली संघासाठी चांगली बातमी! ‘तो’ परत येतोय
- ‘आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास न करता पहिला यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच झालयं…’


