Share

कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या लाट येणार असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. तरीही नागरिक कोणाची पर्वा न करता सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळी, बाजारपेठांमध्ये, कार्यक्रमांमध्ये वावरताना दिसत आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आणि त्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही तरीही नियमांचे खुले उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नाही. कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याने अनेक राज्ये निर्बंधांत ढील देत आहेत. पण असे करताना संपूर्ण सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

सार्वजनिक परिवहनाची साधने आणि पर्वतीय पर्यटनस्थळांवर बेपर्वाईमुळे काही राज्यांत ‘आर’ फॅक्टर वाढला आहे. आर फॅक्टर १.० पेक्षा जास्त झाल्यास कोरोनाचा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे दुकाने, मॉल्स, बाजार, कॉम्प्लेक्स, हॉटेल, बार, भाजी मंडई, बसस्थानक, रेल्वेस्थानके, इत्यादी ठिकाणी कोरोना नियमांचे कडक पालन करणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!