Share

आम्ही दोन दिवसांआड पाणीपुरवठा करू-आंबेडकरांची ग्वाही

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापताना दिसत आहे. पाण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला टार्गेट करण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनीही पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. सध्या औरंगाबादकरांना 9 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ते आम्ही 2 दिवसांवर आणू, असं आश्वासन आंबेडकरांनी दिलंय.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना आणि भाजप संभाजीनगरच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतेय. तर काँग्रेस आणि एमआयएमने संभाजीनगरच्या नावाला विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा या मागणीला अँटी मुस्लिम भुमिकेचा वास येत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. शहराचे नाव बदलायचं असेल तर लोकांचं मत जाणून घ्या, त्यासाठी मतदान घ्या, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

औरंगाबादपेक्षा पुण्याचे नाव संभाजीनगर नामकरण करावी या मागणीला प्रकाश आंबेडकरांनी समर्थन दिले आहे. दोन दिवसांपूर्वी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी संभाजीनगर नामांतराच्या भुमिका मांडली होती. पुण्याला संभाजीनगर नाव देणे हे तर्काला धरून आहे असे त्यांचे म्हणणे आहे. यावर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी देखील सहमती दिल्याचे समजतेय.

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायदे विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शाहीन बाग सारखे किसान बाग आंदोलन येत्या 27 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!