Share

‘पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरे यांनी लस टोचून घेतल्यानंतरच मी लस टोचून घेईन’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.

कोरोनाला थोपवण्यासाठी आजपासून राष्ट्रीय पातळीवर लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. तर, मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरणाचा आरंभ केला आहे. या लसींवर राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक, आमदार अमोल मिटकरी यांच्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील संशय व्यक्त केला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस टोचल्यानंतरच मी लस टोचून घेईन,’ असं आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, जनतेने कुठल्याही अफवांना बळी न पडण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. भारत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आपलल्याला ही मोहीम 30 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि गरज असलेल्या लोकांनाच लस दिली जाईल. भारताची लसीकरण मोहीम खूप मोठी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!