पुणे : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करताना भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. ‘धनंजय मुंडे यांनी भेटून या प्रकरणातील त्यांची बाजू मांडली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण संयमाने हाताळण्याची गरज आहे अशी भूमिका घेतली. तर, दुसरीकडे त्यांचे पक्षप्रमुख (चंद्रकांत पाटील) व अन्य लोकांचे अन्य मत आहेत. अशा प्रकरणात विरोधकांकडून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न या पेक्षा अधिक सांगण्याची गरज नाही’ अशी टीका शरद पवार यांनी केली होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवरून माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं एकच मत आहे. फडणवीस आणि माझ्यात दुफळी नाही. दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. त्यासाठी तुम्ही कधीच यशस्वी होणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंचा वारसदार कोण ? पहिल्या पत्नीची मुलगी की करुणा शर्मांचा मुलगा ?
- मातंग समाजाच्या आरक्षणासाठी दलित महासंघाच्या वतीने होणार राज्यभर आंदोलन
- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला वंदे मातरमचे वावडे?
- ‘महाजेनको’ निर्मिती संचालकपदाच्या नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करा- भाजपा
- लसीकरण साहित्य परत पाठवत शेतकऱ्यांचा भाजप आमदाराला विरोध !


