Share

शरद पवारांनी नैतिकता पाळत चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा- चंद्रकांत पाटील

Published On: 

पुणे:- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एका महिलेने केलेल्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे मुंडे यांच्यासोबतच पक्षाच्या नेत्यांना देखील टीकेचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे तक्रारदार महिलेकडून मला आणि माझ्या वकिलांना जीवे मारण्याचीही धमकी मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंडे यांचे प्रकरण बाहेर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून केली जात आहे. परंतु चौकशी पूर्ण झाल्यावर निर्णय घेऊ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नैतिकता पाळावी. सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शरद पवार यांनी 50 वर्षाच्या जीवनात आरोप झाल्यानंतर त्या व्यक्तीला पाठीशी घातले असे झाले नाही, पण पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने भ्रमनिरास झाला, असेही पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!