औरंगाबाद – प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद शहरात आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ‘केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायदे विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शाहीन बाग सारखे किसान बाग आंदोलन येत्या 27 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
ते म्हणाले, अत्याचारग्रस्तांनी एकत्र येऊ नये म्हणून असे देशातील काहींचे षडयंत्र आहे. म्हणून मुस्लिम आणि इतर घटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम ते करतात. त्यामुळे किसान बागच्या माध्यमातून या आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. मुस्लिम समाजाच्या किसानबाग आंदोलनामुळे जातीवाद राजकारणाला शह मिळेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या महिन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. आता फक्त मुस्लिम समाजाला सोबत घेऊन शाहिनबागच्या धर्तीवर राज्यभरात किसानबाग आंदोलन करण्याची घोषणा आंबेडकरांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- १ रुपयात मिळवा १४९९ रुपयांचे ब्लुटूथ इअरफोन्स !
- ‘फ्रंटलाईन वॉरियर्सचे आभार; लसीकरणाचा हा टप्पा यशस्वीरीत्या पार पडावा यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत
- लॉकडाऊनचा परिणाम, औरंगाबादेत अपघात २८ टक्क्यांनी कमी
- धनंजय मुंडेंचा वारसदार कोण ? पहिल्या पत्नीची मुलगी की करुणा शर्मांचा मुलगा ?
- कंगनावर चोरीच्या आरोपांनंतर निर्माते जैन यांनी दिलं स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
