🕒 1 min read
पुणे : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर व त्यांच्या नातेवाईकांवर एका पाठोपाठ एक आरोप होत असल्याने विरोधी पक्षांनी देखील चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
रेणू शर्मा असं त्या महिलेचं नाव असून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हे आरोप केले आहेत. या रेणू शर्मा या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून त्यांच्याशी संबंधित महिलेच्या बहीण आहेत. मंत्री महोदयांनी करुणा शर्मा या महिलेसोबत 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत असल्याची माहिती सर्वांसमोर आणली ती या रेणू शर्माने आरोप केल्यानंतर. मग आणखी गोंधळ वाढला.प्रकरण इतकं टोकाला गेलं की महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खुद्द शरद पवार यांनी देखील प्रकरण गंभीर स्वरूपाचं असल्याची प्रतिक्रिया दिली.
करुणा शर्मा असं मुंडेंच्या संबंधित महिलेचं नाव असल्याचं धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवरून समोर आलं आहे. तसं वारसदारांमध्ये होणार संघर्ष हा काही महाराष्ट्रासाठी वा राजकारणासाठी नवा नाही ! दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे व पुतण्या धनंजय मुंडे यांच्यामध्ये देखील झालेला संघर्ष उभा महाराष्ट्राने पाहिला आहे.
२०१४ मध्ये पंकजा मुंडे या विजयी झाल्या तर २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि धनंजय मुंडे यांना सामाजिक न्यायमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
हे सरकार आल्यानंतर संबंधित पक्षातील नेत्यांवर व मंत्र्यांवर विरोधी पक्षांनी हल्लाबोल चढवला असतानाच धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेले गंभीर आरोप, निवडणूक प्रतिज्ञापत्रात संबंधित महिला व अपत्य यांची लपवलेली माहिती यामुळे आमदारकी रद्द करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे. त्यांनी या अपत्यांना स्वतःचे नाव देखील दिल्याचे सांगितले आहे. धनंजय मुंडे यांना या संकटांचा सामना करावा लागत असतानाच कौटूंबिक वादाला देखील सामोरं जावं लागत असल्याची चर्चा निर्माण झाली आहे.
धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या पासून तीन अपत्ये आहेत तर करुणा शर्मा यांच्यापासून २ अपत्ये आहेत. पहिल्या पत्नीपासून वैष्णवी, जान्हवी आणि आदिश्री अशा तीन मुली असून ते मुंडेंसोबत परळीला राहतात. तर करुणा शर्मा यांच्यापासून शिवाली ही मुलगी आणि शिव हा मुलगा आहे.
करुणा यांनी मुंडे यांच्याकडे परळीला जाण्यासाठी हट्ट धरला होता. आपला मुलगा शिव यालाच धनंजय मुंडे यांनी राजकीय वारसदार म्हणून पुढे आणावं अशी त्यांची महत्वाकांक्षा आहे. गेल्या १४ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी फेसबुकवर `मै परली वैजनाथ आनेवाली हूं´ अशी पोस्ट केली होती. त्यांना परळीला नेण्यावरूनच या दोघांमध्ये खटके उडत असल्याचे वृत्त झी २४ तासने दिलं आहे.
त्यांनी खासगी फोटो सोशल मीडियात टाकण्यास त्यांनी सुरूवात केली. यावरून धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालय गाठलं. यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी करुणा यांच्या बहिणीने मुंडेंवर अत्याचाराचे आरोप केले. तर रेणू शर्मा या अनेकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पैशासाठी ब्लॅकमेक केल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भाजपचे नेते कृष्णा हेगडे व मनसेचे नेते मनीष धुरी यांनी देखील हनीट्रॅप प्रकरणाला दुजोरा दिला आहे. या सर्व घडामोडी सुरु असतानाच हे सर्व अचानक होण्यामागे वारसदारावरून सुरु असलेल्या कौटुंबिक संघर्षाची पार्श्वभूमी देखील टाळली जाऊ शकत नाही.
महत्वाच्या बातम्या
- कंगनावर चोरीच्या आरोपांनंतर निर्माते जैन यांनी दिलं स्पष्टीकरण
- ..अन् सुनिल केंद्रेकरांनी खांद्यावर पिशवी घेत केला बाजार
- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला वंदे मातरमचे वावडे?
- धनंजय मुंडे हे माझे मित्र नाहीत त्यामुळे राजकीय मदतीचा प्रश्न येतो कुठे?- कृष्णा हेगडे
- औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्गाचा लवकरच सर्व्हे-खा.कराड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
