टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील सांगता सभा पाटण येथे पार पडली.
यावेळी बोलताना कोल्हे यांनी तुमच्या कपाळावर सरकारने बेरोजगारीचा शिक्का मारला असून हा शिक्का पुसुन काढण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा तरुणांचा आवाज बनून पुढे सरसावली आहे तिला साथ द्या असे आवाहन अमोल कोल्हे यांनी पाटणच्या जाहीर सभेत केले. शिवस्वराज्य यात्रा ही राष्ट्रवादीची राहिली नाही तर तो राज्यातील जनतेचा बुलंद आवाज बनली आहे असेही कोल्हे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना कोल्हे यांनी चारा न खाणाऱ्या गाईसारखी अवस्था करून घेवू नका असे आवाहन कोल्हे यांनी केले. तसेच कोल्हे यांनी तरुणांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ द्या असं आवाहन केले. तसेच भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी भूमिपुत्रांना ७५ टक्के देणार असल्याचा पुनरुच्चार केला.
दरम्यान, या सभेला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यात अमोल मिटकरी, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते.
- ‘मुख्यमंत्री पोलिसांचं कडंं घेऊन फिरतात, आपल्या यात्रेत मात्र महाराष्ट्राचा मावळा सामील आहे’
- तुमच्या सर्वांची ताकद शरद पवारांच्या पाठीशी उभी करा : जयंत पाटील
- आता नेते नव्हे तर ‘हा’ संपूर्ण पक्षचं होणार भाजपमध्ये विलीन
- ‘महापुरुषांच्या फोटोत भ्रष्टाचार करणाऱ्यांनी भगवा कसा पेलायचं हे सांगू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

