Share

‘महापुरुषांच्या फोटोत भ्रष्टाचार करणाऱ्यांनी भगवा कसा पेलायचं हे सांगू नये’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहेत. तसेच एकमेकांवर टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पंढरपूर येथे आयोजित सभेत बोलताना अमोल कोल्हे यांनी ‘महाराष्ट्रातील माता भगिनींनी आशीर्वाद दिला तर रंकाचा राव होतो, परंतु त्यांनी शाप दिला तर रावाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवा! तसेच ‘पुन्हा मलाच मुख्यमंत्री करा हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा आहे. ज्यांनी महापुरुषांच्या फोटोत भ्रष्टाचार केला त्यांनी आम्हाला भगवा कसा पेलायचं हे सांगू नका’ अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘हा भगवा माथी भडकवण्यासाठी नाही तर रक्षण करण्यासाठी आहे हे सांगण्यासाठीच आम्ही भगवा हाती घेतला आहे’ असंही विधान कोल्हे यांनी केले आहे. दरम्यान या सभेला महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, सरचिटणीस अमोल मिटकरी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, याच सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये मुख्यमंत्र्यांनी यात्रा काढली होती त्यावेळी त्यांची सत्ता गेली आणि तीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांच्या यात्रेवर टीका केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!