Share

आता नेते नव्हे तर ‘हा’ संपूर्ण पक्षचं होणार भाजपमध्ये विलीन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

नारायण राणे यांनी मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलनाला भेट दिली. त्यानंतर बोलताना नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली. येत्या १ सप्टेंबरला मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. तसेच त्यांच्यासह त्यांचे दोनही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पक्षच भाजपमध्ये विलीन होणार आहे.

नारायण राणे सध्या भाजपचे सहयोगी सदस्य असून राज्यसभेवर खासदार आहेत. भाजपमधल्या प्रवेशानंतर ते अधिकृतरित्या भाजपवासी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा सोहळा होणार आहे. राणे यांनी भाजपसोबत राहणार की नाही याचा निर्णय येत्या दहा दिवसात घेणार असल्याचं त्यांनी मागील आठवड्यात सांगितलं होतं त्याप्रमाणे ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मला अमित शहांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता मुख्यमंत्री याविषयी निर्णय घेणार आसल्याचं सांगितले होते. यावरून फडणवीस यांनी नारायण राणेंना त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करायचा आहे असं विधान केले होते. आणि आता त्यांचा संपूर्ण पक्षचं भाजपमध्ये विलीन होणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!