लातूर: महावितरणचे ढिसाळ कामकाज सर्व श्रुत आहे. सध्या ढिसाळ काम करणारी महावितरण आपल्याच कामाचा रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे की काय असा प्रश्न पडला आहे. अशीच एक ढिसाळ कामाची घटना निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे घडली, वीज वितरण कंपनी कडुन एका ग्राहकाची वीज जोडणी तोडूनही शंभर युनिटचे बील आले आहे. त्यामुळे त्या ग्राहकाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या वर्षभरापासून राज्यासह देशात कोरोना महामारी रोगाने थैमान घातले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यातच वीज वितरण कंपनी कडुन सामान्या ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. अनेकांच्या हाताला काम नसल्याने कसाबसा संसार भागवत असताना वीज वितरण कंपनी कडून अव्वाच्या सव्वा लाइट बीले देण्यात आली आहेत. एका एका ग्रहाकाचे बील जवळपास दहा ते साठ हजार रूपयांपर्यंत आले आहे. लाईट बीले वेळेत भरली नाहीत म्हणुन मार्च एंन्डचे कारण देत कृषिसह घरगुती वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.
पण वीज पुरवठा खंडीत करुनही परत वीज वापर होत असल्याचे सांगत लाईट बील देण्यात आले आहे. असाच प्रकार कासार शिरसी येथील विठ्ठल कोकरे यांच्या बाबतीत घडला आहे. कोकरे यांना कोरोना मुळे काम बंद असल्याने एक वर्ष लाईट बील भरणे झाले नाही. जानेवारी २०२१ मध्ये साठ हजार रुपयांपेक्षा जास्त घरगुती लाईट बील आले. त्यांना हे बील भरणे शक्य नसल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आले. परंतु पून्हा मार्च महिन्यात शंभर युनिटचा वापर झाल्याचे सांगत १०० युनिटचे बील आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय महिला संघात कोरोनाचा शिरकाव; हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण
- बॉलिवूडवर कोरोनाचं सावट ; प्रसिद्ध संगीतकार ‘बप्पी लहरी’ कोरोना पॉजिटीव्ह
- आयपीएल आधी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना मोठे धक्के
- ‘कोरोना आम्हाला स्पर्शही करणार नाही’ या फाजील आत्मविश्वासातून कोरोना वाढत गेला’
- बीड जिल्हा; पीपीई कीट घालून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप कोरोना रुग्णांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

