Share

आयपीएल आधी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना मोठे धक्के

Published On: 

मुंबई : येत्या ९ एप्रिल पासून आयपीएलचे नवे सत्र सुरु होत आहे. सलामीचा सामना हा मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संघात चेन्नई येथे होणार आहे. मात्र यापुर्वीच आयपीएलच्या काही संघासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपीटल या संघासाठी आहे.

आयपीएलच्या सर्व संघानी स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक संघाच्या सराव शिबीरात सरावालाही सुरु झाली आहे. मात्र दिल्ली, चेन्नई आणि मुंबई संघातील काही प्रमुख खेळाडू हे आयपीएल स्पर्धेत दिसण्याची शक्यता कमीच आहे. याचा परिणाम संघाच्या कामगीरीवरही होऊ शकतो. सध्या दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान संघात २ एप्रिलपासून क्रिकेट मालिका सुरु होणार आहे. या स्पर्धेत क्विंटन डीकॉक, रबाडा, नॉर्तजे, एनगीडी आणि मिलर हे आयपीएलमधील काही सामने खेळू शकत नाही.

ही मालिका संपल्यानंतर या खेळाडूंना कोरोना नियमामुळे आयपीएल स्पर्धेत थेट खेळता येणे अशक्य आहे. डीकॉक हा मुंबई इंडियन्सकडून सलामीला खेळत असतो. तर रबाडा आणि नॉर्टजे हे दिल्लीच्या संघाचे प्रमुख गोलंदाज आहे. तर निगडी हा चेन्नईच्या संघाकडून गोलंदाजी करतो. या स्पर्धेत कोणत्याही संघाचे सामने हे घरच्या मैदानावर होणार नाही. तर प्रत्येक संघाला कमी वेळ प्रवास करावा लागेल याची व्यवस्था आयपीएल गव्हर्नीग कॉन्सीलने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!