बीड: जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लावण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णांमुळे प्रशासनच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात सोमवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी रुग्णांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे काही काळ रुग्णांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजनच्या लिक्वीड प्लँटचे उद्घाटन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर त्यांनी कोविड कक्षात भेटीसह जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग व परिसराचीही पाहणी केली.पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्णांचा उच्चांक व्हायला जिल्ह्यात सहा महिने लागले होते. आता मात्र, या मार्च मध्ये दुसरी लाट आली आणि पाहता पाहता आजघडीला ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या २६०० च्या घरात गेली आहे. दरम्यान, आतापर्यंत साडेसहाशेवर कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
गंभीर बाब म्हणजे अलीकडे रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या तीनशे ते चारशेंच्या घरात आहे. सोमवारीही पावणेचारशेंवर रुग्ण जिल्ह्यात आढळले. पूर्वी शेकडा दहा टक्के असलेले रुग्णांचे प्रमाण सोमवारी १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. प्रसाराचा वेग वाढल्याचे चित्र आहे. यावर उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी जगताप यांनी जिल्ह्यात दहा दिवसांचे लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! जमिनीच्या लालसेपोटी पत्नीला संपवलं
- दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची झाली निवड, अजिंक्य, पृथ्वी शॉ स्पर्धेतून बाहेर
- ‘लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही’
- ना तुम जानो ना हम… दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं
- शाब्बास लातूरकर! ९८ हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

