मुंबई : गेल्या काही दिवसात राज्य आणि देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोके वर काढू पाहत आहे. कोरोनाच्या या लाटेने बॉलीवूडसह क्रिडा क्षेत्रातील अनेक व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले आहे. आता भारतीय महिला क्रिकेट संघात कोरोनाने शिरकाव केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची खेळाडू हरमनप्रित कौरला कोरोनाची लागण झाली आहे.
हरमनप्रितला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने तीने कोरोनाची चाचणी करुन घेतली असता तिचा रिपोर्ट सकारात्मक आला. यांनतर हरमनप्रितने स्वत:ला घरीच आयसोलेट करुन घेतले आसुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हरमनप्रित संघाची सदस्य होती. हरमनप्रित या मालिकेतील ५ सामन्यात १५० धावा केल्या होत्या.
हरमनप्रित व्यतीरीक्त भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनाही कोरोनाची लागण झाली आहे. यात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, युसुफ पठान, इरफान पठान आणि बद्रीनाथ या खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व क्रिकेटपटू घरीच उपचार घेत आहे. याव्यतिरीक्त कोरोनाने बॉलीवूडमध्येही अनेक कलाकारांना कोरोनाची लागन झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल आधी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना मोठे धक्के
- दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची झाली निवड, अजिंक्य, पृथ्वी शॉ स्पर्धेतून बाहेर
- ‘लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही’
- ना तुम जानो ना हम… दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं
- शाब्बास लातूरकर! ९८ हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
